Category Archives: मुंबई

मुंबई म्हाडाच्या २०३० घरांच्या विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरवात; अर्ज कसा कराल?

मुंबई : म्हाडाच्या गोरेगाव, अँटॉप हिल, कोपरी पवई, कन्नमवारनगर, शिवधाम कॉम्प्लेक्स (मालाड) या गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांतील दोन हजार ३० घरांच्या विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला शुक्रवार, ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ पासून सुरुवात होणार आहे. १३ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता लॉटरी काढण्यात येईल. अर्ज प्रक्रियेची लिंक दुपारी १२ पासून उपलब्ध होईल. ऑनलाइन अर्जांची मुदत ४ सप्टेंबर, दुपारी ३ पर्यंत आहे. अनामत रकमेची ऑनलाइन स्वीकृती ४ सप्टेंबर रात्री ११:५९ पर्यंत केली जाईल. अर्जांची प्रारूप यादी ९ सप्टेंबरला सायंकाळी ६ पर्यंत प्रसिद्ध होईल. ऑनलाइन दावे, हरकतीसाठी ९ सप्टेंबर, दुपारी १२ पर्यंत मुदत आहे. अर्जाची अंतिम यादी ११ सप्टेंबरला सायं. ६ वाजता प्रसिद्ध होईल.

घरे आली कोठून? 

म्हाडाने स्वत: बांधलेल्या १३२७ घरांबरोबरच कास नियंत्रण नियमावली ३३(५), ३३(७) आणि ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून बिल्डरांकडून गृहसाठा म्हणून मिळालेली ३७० घरे आणि पूर्वीच्या लॉटरीतील विविध वसाहतींत विखुरल्या स्वरूपात असलेल्या ३३३ घरांचा समावेश या सोडतीत करण्यात आला आहे.

सोडतीसाठी

लॉटरीत सहभागी होण्याकरिता म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टीम मोबाइल ॲपची सुविधा

https://housing. mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी, अर्ज भरणा आणि अनामत जमा प्रक्रिया अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनिचित्रफिती आणि हेल्प फाईल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे .

वार्षिक उत्पन्न मर्यादा गट – उत्पन्न मर्यादा अत्यल्प ६ लाख, अल्प ९ लाख ,मध्यम १२ लाख,  उच्च १२ लाखांहून अधिक (या गटासाठी कमाल मर्यादा नाही.)

सावधानम्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार आणि प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणाशीही व्यवहार करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

गणेशभक्तांना खुशखबर; आता ‘क्यूआर” द्वारे मिळणार कृत्रिम तलावांची माहिती

मुंबई: गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात कृत्रिम तलावांची यादी गुगल मॅपवर मिळणार आहे. क्यूआर कोडद्वारे गणेशभक्तांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. यंदाचा गणेशोत्सव ७ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होत आहे. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ऑनलाईन खरेदी माध्यमांशी संपर्क साधून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घरपोच वितरण करण्याच्या सुविधा पुरवण्याकरत समन्वय देखील साधण्यात येणार आहे. याच उपक्रमांचा भाग म्हणून श्रीगणेश मूर्ती घडविणाऱ्या मुर्तिकारांना शाडूची माती पुरविणे, काही ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे, मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने श्री गौरव स्पर्धेचे आयोजन करणे असे विविध उपक्रम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहेत.
[spacer height=”20px”]

मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीत यंदाच्या गणेशोत्सवात कृत्रिम तलावांची संख्या २०० पेक्षा अधिक वाढवण्याचे लक्ष्य असल्याचे मंगलप्रभात लोढा म्हणाले.

धोक्याच्या ठिकाणी रील बनवणे जिवावर बेतले; रायगडमध्ये धबधब्यात पडल्याने रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदारचा दुर्दैवी मृत्यू

 

रायगड: इंस्टाग्रामवर आपल्या ट्रॅव्हल संबंधित पोस्टसाठी प्रसिद्ध असलेल्या रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदार यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईजवळ रायगडमध्ये एका धबधब्यात पडल्याने रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदार यांचा मृत्यू झाला. अन्वीला प्रवासाची आवड होती. तिने आपल्या या आवडीला करियर बनवले होते. प्रारंभिक तपासात समोर आले आहे की रायगडमध्ये कुंभे धबधब्याचे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करण्याच्या प्रयत्नात अन्वीचा हा अपघात झाला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अन्वी कामदार यांच्या इंस्टाग्रामवर दोन लाख ५४ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. अन्वीने सीएचे शिक्षण घेतले होते आणि काही काळ डिलॉइट या कंपनीत नोकरीही केली होती. मुंबईत राहणाऱ्या अन्वी कामदार मान्सूनमध्ये कुंभे धबधब्याची शूटिंग करण्यासाठी पोहोचल्या होत्या.

[spacer height=”20px”]

३०० फुट खोल दरीत पडल्याने मृत्यू

अधिकार्यांनी सांगितले की, अन्वी कामदार एक रील शूट करत असताना ३०० फुट खोल्या दरीत पडल्या. हा अपघात रायगडजवळ कुंभे धबधब्यावर घडला. अन्वी १६ जुलै रोजी सात मित्रांसह धबधब्याच्या सैर करायला गेल्या होत्या. आज सकाळी सुमारे १०.३० वाजता हा प्रवास दुर्दैवी वाटेवर गेला. जेव्हा अन्वी व्हिडिओ शूट करत असताना एका खोल दरीत पडल्या. स्थानिक अधिकार्यांनी तात्काळ आपत्कालीन परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आणि एक बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. तटरक्षक दलांच्या सोबत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचार्यांची अतिरिक्त मदत मागवण्यात आली पण अन्वीला वाचवता आले नाही. अन्वीने इंस्टाग्रामवर आपल्या बायोमध्ये स्वत:चा परिचय देताना “यात्रा जासूस” असे लिहिले आहे. अन्वीला प्रवासाच्या सोबत चांगल्या स्थळांची माहिती देण्याचीही आवड होती.

 

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची उद्या परळ येथे एल्गार सभा

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व रखडलेले सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावा : श्री.यशवंत जडयार*

 

मुंबई दि. २० जुलै:अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईची एल्गार सभा रविवार दि.२१ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वा. सोशल सरव्हिसलिग हायस्कूल दामोदर हॉलच्या बाजूला परळ मुंबई येथे समिती अध्यक्ष श्री.शेखर बागवे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

समितीच्या माध्यमातून मागील सहा महिन्यांपासून कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे, रखडलेल्या सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावणे व त्याला प्रा.मधू दंडवते साहेब यांचे नाव देणे,नियोजित वसई सावंतवाडी पॅसेंजर व कल्याण सावंतवाडी पॅसेंजर सुरू करणे,दादर रत्नागिरी इंटरसिटी एक्सप्रेस व दिवा चिपळूण मेमू रेल्वे नेहमीसाठी सुरू करणे अशा महत्वाच्या मागण्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागण्या करूनही त्या मिळत नसल्याने यापुर्वीही परळ येथील प्रा.मधू दंडवते जन्मशताब्दी उत्सव व सावंतवाडी रोड स्टेशन येथील टर्मिनससाठी केलेले उपोषणातून समितीने मोठे शक्ती प्रदर्शन केलेले आहे,यासाठी ही एल्गार सभा खूप महत्वाची आहे.

गणेशउत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण,याला मुंबईतून लाखो चाकरमनी कोकणातील आपल्या गावी जातात, त्यासाठी त्यांना पुरेशा कोकण रेल्वेच्या रेल्वे मिळवून देण्यासाठी ही सभा समस्त कोकणवासियांच्या दृष्टीने खूप महत्वाची असल्याचे अध्यक्ष श्री.शेखर बागवे यांनी सांगितले.

कित्येकदा कोकण रेल्वेमार्गावरून गणेशउत्सवासाठी सोडलेल्या जादा गणपती स्पेशल एक्सप्रेसचे तिकीट बुकींग पहिल्या तीन मिनीटामध्येच फुल होते,याच्याने खरा लाभार्थी असलेला कोकणी माणूस तिकीटापासून वंचितच राहतो,चाकरमन्यांचा रेल्वे प्रशासनाला प्रश्न आहे की,रेल्वेच्या दलालांचे बुकींग कसे होते?मग सर्वसामान्य कोकणी माणसाला गणपतीचे तिकीट का मिळत नाही?

लोकसभेची निवडणूक समोर ठेवून कोकणातील अनेक नेत्यांनी समितीला आश्वासने दिली होती त्याचे पुढे काय झाले? यासाठी ही एल्गार सभा निर्णायक ठरणार आहे,अन्यथा विधानसभेची निवडणूक फक्त पुढील तीनच महिन्यांवर आलेली आहे.

समितीच्या ह्या एल्गार सभेला मुंबई,नवी मुंबई,लालबाग परळ,बोरीवली,मिरा भाईदर,वसई विरार,बोईसर पालघर,भांडूप,ठाणे दिवा,कल्याण डोंबीवली,बदलापूर परिसरातील कोकण वासियांनी मोठया संस्थेने सहभागी व्हावे असे आवाहन सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी केले आहे.

Mumbai Local | मध्य उपनगरीय रेल्वेच्या वेळापत्रकात ऑगस्टपासून बदल

मुंबई: मध्य उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने उपनगरीय लोकलच्या नव्या वेळापत्रकाची आखणी केली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्यानुसार सीएसएमटीहून सुटणाऱ्या १० लोकल दादर स्थानकातून सुटणार असून परळ स्थानकातून अतिरिक्त २४ लोकल फेऱ्या सोडण्यात येणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.
[spacer height=”20px”]
दादर रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या सोयीसाठी काही महिन्यांपूर्वीच प्लॅटफॉर्म क्रमांक आठ रुंद करण्यात आला. फलाट क्रमांक दहाचे दुतर्फीकरण झाल्याने जलद लोकलमध्ये दोन्ही बाजूने चढ-उतार करण्याचा पर्याय उपलब्ध झाला, तसेच फलाट क्रमांक नऊ आणि दहादरम्यान असलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल हटविले; मात्र तरीही दादर स्थानकांतून लोकल पकडताना प्रवाशांची गैरसोय होत होती. त्याबाबत अनेक तक्रारी मध्य रेल्वेकडे केल्या होत्या. याची दाखल घेऊन मध्य रेल्वेने दादर आणि परळ स्थानकातून आणखी लोकल सोडण्याचे नियोजन केले असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून लोकलच्या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
[spacer height=”20px”]
मध्य रेल्वेला सध्या नव्याने लोकल चालवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे नव्या वेळापत्रकात कोणत्याही नव्या लोकलचा समावेश करण्यात आलेला नाही. सध्या धावणाऱ्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सीएसएमटीहून सुटणाऱ्या अप आणि डाऊनच्या प्रत्येकी पाच अशा एकूण १० फेऱ्या दादर स्थानकातून, तर २४ धीम्या लोकल फेऱ्या परळ स्थानकातून चालवण्यात येणार आहेत. सध्या परळ स्थानकातून २२ फेऱ्या सूटत असल्याने परळहून सुटणाऱ्या फेऱ्यांची एकूण संख्या ४६ पर्यंत पोहोचणार आहे.