Category Archives: सिंधुदुर्ग

परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनससाठी राबवलेल्या “हर घर टर्मिनस” मोहिमेला कोकणवासियांचा अभूतपूर्व प्रतिसाद

आतापर्यंत २००० पेक्षा जास्त संख्यने ई-मेल पाठवले गेले– फेसबुक वरील रील मोठ्याप्रमाणात व्हायरल –व्हाट्सअँप ग्रुप एका दिवसात फुल्ल
   Follow us on        
[spacer height=”20px”]
सावंतवाडी:दि. १४ जुलै: कोकण रेल्वे येण्यासाठी कोणताही विरोध न करता आपल्या जमिनी या प्रकल्पाला देणाऱ्या कोकणकरांच्या हाती दोन ते तीन गाड्या सोडल्या तर काही लागले नाही. अनेकवर्षे प्रवासी संघटनेने केलेल्या वसई-सावंतवाडी, कल्याण-सावंतवाडी, बोरिवली/सावंतवाडी या मार्गावर गाड्यांच्या केलेल्या मागण्या अपूर्ण आहेत. या गाड्या चालविण्यासाठी सावंतवाडी टर्मिनस चे काम पूर्ण होणे महत्वाचे आहे. होळी- गणेशचतुर्थीला कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालविण्यात येतात. मात्र सावंतवाडी टर्मिनस च्या अपूर्ण कामामुळे त्या गाड्या दक्षिणेकडील राज्यात पाठवल्या जातात आणि ज्यांच्यासाठी या गाड्या सोडल्या त्यांनाच रेल्वे आरक्षणापासून वंचित राहावे लागते. चार दिवसांपूर्वी पेडणे येथील बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे कोकणरेल्वे पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या घटनेने मागील ९ वर्षे विनाकारण रखडलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची गरज पुन्हा एकदा जाणवली आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटना,सावंतवाडी या संघटनेद्वारे कोकणकर पुन्हा एकदा या प्रश्नावरून आक्रमक झाला. सावंतवाडी टर्मिनस च्या रखडल्या कामाविरोधात  आणि अन्य प्रश्नांसाठी संघटनेने  “हर घर टर्मिनस” ही मोहीम राबवली असून मागील दोन दिवसांत समस्त कोकणकरांचा या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
[spacer height=”20px”]
हर घर टर्मिनस मेल मोहिम
संघटनेने “हर घर टर्मिनस मेल मोहिम ” राबवली असून समस्त कोकणवासीयांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
[spacer height=”20px”]
आपल्या हक्कासाठी, कोकणकरांच्या सुखकर व निर्विघ्न प्रवासासाठी संवैधानिक हक्कासाठी,  भुमीपुत्रांच्या विकासासाठी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत तत्काळ विलीनीकरण व्हावे, सांवतवाडी येथे रेल्वे टर्मिनस व्हावे, फक्त व फक्त कोकणासाठी नवीन गाड्या किंवा वाढीव थांबे मिळावे या आपल्या मागण्यांसाठी रेल्वे प्रशासन, केन्द्र सरकार व राज्य सरकारला जाग येण्यासाठी शेकडोच्या संख्येने ईमेल पाठवायचे आहेत.  सोबत मेलचा मायना दिला आहे तो आपल्या ईमेल ने सन्माननीय रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री, रेल्वे बोर्ड, रेल्वे विभाग व कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक आणि महाराष्ट्र शासनाचे मंत्री यांना पाठवायचे आहेत हजारोंच्या संख्येने ईमेल सर्व बांधव, भगिनी, कोकणवासी, सार्वजनिक मंडळ, कोकण विकास समित्या, समाजिक संस्था व कार्यकर्त्यांच्या घराघरातून सर्वानी वैयक्तिक पाठवायचे आहेत. फक्त एका टिचकीवर किंवा वरील QR Code द्वारे हे निवेदन आपल्या जिमेल मध्ये उघडेल तेथून फक्त आपल्याला सेंड बटन दाबून पाठवायचे आहे असे आवाहन संघटनेद्वारे करण्यात आले आहे.
[spacer height=”20px”]
[spacer height=”20px”]
या मोहिमेत आतापर्यंत २००० पेक्षा जास्त संख्यने ई-मेल पाठवले गेले असून या मोहिमेस खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याची संघटनेतर्फे श्री. सागर तळवडेकर यांनी दिली आहे.
[spacer height=”20px”]
‘ती’ पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल 

सावंतवाडी टर्मिनसच्या सुशोभणीकरणादरम्यान प्रवशेद्वारावर लावण्यात आलेल्या “सावंतवाडी रोड” फलकाच्या निषेधार्थ फलकाच्या समोरच संघटनेतर्फे नाराजीचे फलक लावण्यात आले आहेत. या संबंधित पोस्ट केलेली एक रील समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून आतापर्यंत ७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूव्स Views आले तर हजारो कोकणकरांनी तिला लाईक केले आहे. संघटनेतर्फे बनविण्यात आलेल्या व्हाट्सअँपग्रुपला पण खूप मोठा प्रतिसाद लाभत असून फक्त एक दिवसात ग्रुप फुल्ल झाला आहे. तर अन्य ग्रुप ची लिंक या बातमीत खाली दिली आहे.
[spacer height=”20px”]

कुडाळ: शाळकरी मुलांकडून साळगाव जांभरमळा प्राथमिक शाळेतील मुलांना वह्या वाटप

क्रिकेट व भजन मंडळाच्या माध्यमातून प्राप्त रक्कमेचा समाजोपयोगी विनियोग

 

साळगाव जांभरमळा येथील श्री पाटेकर बालगोपाल भजन व क्रीडा मंडळाने मे 2024 मध्ये क्रिकेट सामने आयोजित केले होते. जमा झालेल्या निधीतून या मंडळातील शाळकरी मुलांनी शैक्षणिक उपक्रम हाती घेतला. साळगाव जांभरमळा प्राथमिक शाळेतील मुलांना वह्या वाटप करून या मंडळातील शाळकरी मुलांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. साळगाव पंचक्रोशी मध्ये या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या मंडळातील कु. चैतन्य हळदणकर, कु. स्वप्नील सामंत, कु. सर्वेश हळदणकर, कु. तुकाराम हळदणकर, कु. कुणाल पारकर, कु. अजिंक्य हळदणकर, कु. शंकर नागडे, कु. प्रथमेश डिचोलकर, कु. सोहम हळदणकर, कु. साहिल हळदणकर, कु. शुभम धुरी यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

[spacer height=”20px”] वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी पालकवर्गातून श्री. सुखानंद हळदणकर, श्री.निलेश सावंत, श्री.शुभम धुरी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. प्रशांत वेंगुर्लेकर सर, शिक्षक श्री. विनेश जाधव सर यांनी साळगाव जांभरमळा शाळेच्या वतीने श्री पाटेकर बालगोपाल भजन व क्रीडा मंडळाचे आभार व्यक्त केले

[spacer height=”20px”]

आंबोली: हुल्लडबाजीच्या सर्व मर्यादा पार, जिल्हा परिषद शाळेतच पर्यटकांची मद्य पार्टी

सावंतवाडी : आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून हुल्लडबाजी केल्याच्या बर्‍याच तक्रारी येत आहेत. आता तर काही पर्यटकांनी चक्क विद्येचे माहेरघर असलेल्या शाळेतच मद्याची पार्टी करून हद्दच पार केली आहे. आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हुल्लडबाज लोकांकडून विद्येचे मंदीर असणाऱ्या शाळेत मद्यपानास बसल्याची घटना घडली. भाजप माजी तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. देवस्थान, मंदीर परिसरात असे प्रकार घडता नये याची काळजी पोलिसांकडून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा जनतेला यात लक्ष घालावे लागेल असा इशारा श्री. गावडे यांनी दिला आहे‌.





आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला. माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे येथील शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेले असता पालकांनी संबंधितांचा व्हिडिओ दाखवत आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली. यानंतर पोलिस निरिक्षकांच संदीप गावडे यांनी लक्ष वेधल‌. श्री गावडे म्हणाले, अशा लोकांना पर्यटक म्हणणार नाही. केवळ मद्य पिऊन मजा करायला येणारी ही लोक आहेत. शाळेत केलेला हा प्रकार निंदनीय आहे. शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेलो असता तिथल्या पालकांनी ही व्यथा मांडली. मन हेलावून टाकणारा हा प्रकार आहे. पर्यटनाच्या नावाखाली होणारा त्रास कमी झाला पाहिजे. शाळा, देवस्थान असतील अशा ठिकाणी असे प्रकार घडता नयेत. बाहेरून येणारे पर्यटक या ठिकाणी हुल्लडबाजी करतात. हे प्रकार बंद झाले पाहिजेत. याबाबत पोलिसांनी माहिती देऊन त्याप्रकारचं निवेदन दिले आहे. आंबोली, चौकुळ भागात ज्या ठिकाणी असे प्रकार होतात त्याबद्दल पोलिसांना कल्पना दिली आहे. ताबडतोब कारवाईची मागणी केली आहे. विशेषतः शनिवारी, रविवारी असे प्रकार घडतात. त्याला आळा घालण्याची गरज आहे. पोलिसांनी याबाबत दक्षता घेणार असल्याचे सांगितले. यापुढे असे प्रकार दिसल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तशी कारवाई न झाल्यास एक नागरिक म्हणून प्रतिकार आम्ही करू, स्थानिकांच्या बाजून आम्ही राहू. या अशाच गोष्टींमुळे मारहाणीसारखे प्रकार घडतात. त्यामुळे पोलिसांनी योग्य उपाययोजना करावी, अशा लोकांवर कारवाई न केल्यास जनता म्हणून आम्हाला त्यात लक्ष घालावं लागेल असं मत त्यांनी व्यक्त केल. यावेळी आंबोली प्रमुख गांवकर तानाजी गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे आदी उपस्थित होते.

सावंतवाडी: आंबोली घाटरस्त्यात कोसळला भला मोठा दगड; रस्ता खचण्याची शक्यता

सावंतवाडी, दि. १७ जुलै: :  आंबोलीत काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान आज (दि.17) सकाळी आंबोली घाटमार्गात दरडीतील भला मोठा दगड कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणालाही हानी झाली नाही. ही घटना  सकाळी ७ च्या सुमारास घडली. .या घटनेमुळे सद्या घाटमार्गातून एकेरी वाहतूक सुरू आहे. तर दगड कोसळलेल्या ठिकाणी लहान – मोठे धबधबे असून नेहमी तेथे पर्यटकांची रेलचेल असते. त्यावेळी अशी घटना घडली असती तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती, मात्र, सकाळी ७ वा. सुमारास सदर घटना घडल्याने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. तर भला मोठा दरडीतील दगड थेट घाटमार्गात कोसळल्याने रस्त्याला मोठा खड्डा पडत भेग पडली आहे. त्यामुळे रस्ता खचण्याची शक्यता आहे.



[spacer height=”20px”]
वाहन चालकांनी याबाबतची माहिती आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई यांना दिली. त्यानंतर त्यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली. सध्या जेसीबीच्या सहाय्याने हा दगड हटविण्याचे काम सुरु आहे. सुदैवाने या घटनेवेळी त्या ठिकाणी कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. सद्यस्थितित या भागातून एकेरी वाहतूक सुरू असल्याची माहिती दत्तात्रय देसाई यांनी दिली आहे.
[spacer height=”20px”]