Author Archives: batmi24

खुशखबर! पश्चिम रेल्वेची गणपती विशेष गाड्यांची यादी तयार; कोकण,मध्य आणि दक्षिण रेल्वेकडून प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत

Proposal for Special Trains:कोकणातील गणेशभक्तांसाठी पश्चिम रेल्वेकडून एक खुशखबर आहे. मध्यरेल्वेने गणपती विशेष गाड्यांची  यादी जाहीर केल्यानंतर पश्चिम रेल्वेनेही आपली गणपती विशेष गाड्यांची यादी तयार केली असून ती कोकण रेल्वे, मध्यरेल्वे आणि दक्षिण रेल्वेला मंजुरीसाठी पाठवली आहे. या यादीला या विभागांकडून हिरवा कंदील भेटल्यानंतर ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. याआधी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण अवघे काही मिनिटातच फुल झाल्याने तिकिटे न मिळालेल्या प्रवाशांना आरक्षित तिकिटे मिळवण्याची अजून एक संधी भेटणार आहे.

[spacer height=”20px”]
जाहीर करण्यात आलेल्या गाड्यांची यादी 
महत्वाची सूचना:ही यादी अंतिम स्वरूपाची नसून रेल्वे विभागांकडून आलेल्या बदलाप्रमाणे त्यात बदल केला जाऊ शकतो  
[spacer height=”20px”]
१) ०९००१/०९००२ मुंबई सेंट्रल – ठोकूर – मुंबई सेंट्रल साप्ताहिक विशेष (एकूण ६ फेऱ्या) 
[spacer height=”20px”]
गाडी क्रमांक ०९००१ विशेष मुंबई सेंट्रल येथून मंगळवार दिनांक ०३,१० आणि १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.३० वाजता ठोकूर येथे पोहोचेल.
[spacer height=”20px”]
गाडी क्रमांक ०९००२ विशेष ठोकूर येथून बुधवार दिनांक ०४,११ आणि १८ सप्टेंबर रोजी सकाळी  १०.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०७.०५ वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल. (सावंतवाडी स्थानकावरील वेळ – १७.४०)
[spacer height=”20px”]
या गाडीचे मडगावपर्यंतचे थांबे: बोरिवली, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,  राजापूर रोड, वैभववाडी रोड,कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम, करमाळी आणि मडगाव
[spacer height=”20px”]
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५, सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २४ डबे
[spacer height=”20px”]
[spacer height=”20px”]
२) ०९००९/०९०१० मुंबई सेंट्रल-सावंतवाडी-मुंबई सेंट्रल (आठवड्याचे ६ दिवस) विशेष (एकूण २६ फेऱ्या)
[spacer height=”20px”]
गाडी क्रमांक ०९००९ विशेष मुंबई सेंट्रल येथून दिनांक ०२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबरपर्यंत मंगळवार वगळता दररोज दुपारी १२.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०२:३० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
[spacer height=”20px”]
गाडी क्रमांक ०९०१० विशेष सावंतवाडी  येथून दिनांक ०३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबरपर्यंत बुधवार वगळता दररोज पहाटे ०५.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २०:१० वाजता मुंबई सेन्ट्रल येथे पोहोचेल.
[spacer height=”20px”]
थांबे: बोरिवली, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ
[spacer height=”20px”]
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५, सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २४ डबे
[spacer height=”20px”]
[spacer height=”20px”]
 ३) ०९०१५ /०९०१६  वांद्रे (T) – कुडाळ – वांद्रे (T) साप्ताहिक विशेष (एकूण ६ फेऱ्या) 
[spacer height=”20px”]
गाडी क्रमांक ०९०१५ विशेष  वांद्रे टर्मिनस Bandra येथून गुरुवार दिनांक ०५ ,१२ आणि १९ सप्टेंबर रोजी दुपारी १४.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५.४० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
[spacer height=”20px”]
गाडी क्रमांक ०९०१६ विशेष कुडाळ येथून शुक्रवार दिनांक ०६,१३  आणि २० सप्टेंबर रोजी सकाळी ०६.४५  वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१.३० वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल.
[spacer height=”20px”]
थांबे: बोरिवली, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग.
[spacer height=”20px”]
डब्यांची रचना: सेकंड सीटिंग – २०, एसएलआर – ०१  ब्रेकव्हॅन – ०१  असे मिळून एकूण २२ LHB कोच
[spacer height=”20px”]
[spacer height=”20px”]
४) ०९०१८/०९०१७ उधना – मडगाव – उधना (साप्ताहिक) विशेष (एकूण ६ फेऱ्या) 
[spacer height=”20px”]
गाडी क्रमांक ०९०१८ विशेष उधना येथून शुक्रवार दिनांक ०६,१३  आणि २० सप्टेंबर रोजी दुपारी १५,२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०९.३० वाजता मडगाव  येथे पोहोचेल.  (पनवेल स्थानकावरील वेळ – २०.२०)
[spacer height=”20px”]
गाडी क्रमांक ०९०१७ विशेष मडगाव येथून शनिवारदिनांक ०७,१४, २१ सप्टेंबर रोजी सकाळी १०.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०५.०० वाजता उधना येथे पोहोचेल.
[spacer height=”20px”]
थांबे: नवसारी, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम, करमाळी.
[spacer height=”20px”]
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५, सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २४ डबे
[spacer height=”20px”]
[spacer height=”20px”]
५) ०९०२०/ ०९०१९ उधना – मडगाव – उधना द्विसाप्ताहिक विशेष भाड्यावर विशेष ट्रेन(एकूण १० फेऱ्या) 
[spacer height=”20px”]
गाडी क्रमांक ०९०२० विशेष उधना येथून शनिवार आणि बुधवार दिनांक ०४,०७,११,१४,१८ सप्टेंबर रोजी दुपारी १५.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०९.३० वाजता मडगाव  येथे पोहोचेल. (पनवेल स्थानकावरील वेळ – २०.२०)
[spacer height=”20px”]
गाडी क्रमांक ०९०१९ विशेष मडगाव येथून रविवार आणि शुक्रवार दिनांक ०५,०८,१२,१५,१९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०५.०० वाजता उधना येथे पोहोचेल.
[spacer height=”20px”]
थांबे: नवसारी, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी, करमाळी.
[spacer height=”20px”]
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५, सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २४ डबे
[spacer height=”20px”]
[spacer height=”20px”]
६) ०९४१२/०९४११ अहमदाबाद – कुडाळ – अहमदाबाद (साप्ताहिक) विशेष (एकूण ६ फेऱ्या)
[spacer height=”20px”]
गाडी क्रमांक ०९४१२ विशेष अहमदाबाद येथून मंगळवार दिनांक ०३,१०,१७ सप्टेंबर रोजी सकाळी ०९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.१० वाजता कुडाळ येथे पोहोचेल. (पनवेल स्थानकावरील वेळ – १७.२०)
[spacer height=”20px”]
गाडी क्रमांक ०९४११ विशेष कुडाळ येथून बुधवार दिनांक ०४,११,१८ सप्टेंबर रोजी सकाळी ०६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:३० वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.
[spacer height=”20px”]
थांबे: अहमदाबाद, गेरातपुर, वडोदरा, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे,राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग
[spacer height=”20px”]
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५, सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २४ डबे
[spacer height=”20px”]
[spacer height=”20px”]
७) ०९१५०/०९१४९ विश्वामित्री – कुडाळ – विश्वामित्री (साप्ताहिक) विशेष (एकूण ६ फेऱ्या) 
[spacer height=”20px”]
गाडी क्रमांक ०९१५० विशेष विश्वामित्री येथून सोमवार दिनांक ०२,०९,१६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.१० वाजता कुडाळ येथे पोहोचेल. (पनवेल स्थानकावरील वेळ – १७:५०)
[spacer height=”20px”]
गाडी क्रमांक ०९१४९ विशेष कुडाळ येथून मंगळवार दिनांक ०३,१०,१७ सप्टेंबर रोजी सकाळी ०६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी  रात्री १ वाजता विश्वामित्री येथे पोहोचेल.
[spacer height=”20px”]
थांबे: भारूच, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग
[spacer height=”20px”]
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५, सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २४ डबे
[spacer height=”20px”]
[spacer height=”20px”]
८) ०९४२४/०९४२३ अहमदाबाद – मंगुळुरु -अहमदाबाद साप्ताहिक टीओडी विशेष (एकूण ६ फेऱ्या) 
[spacer height=”20px”]
गाडी क्रमांक ०९४२४ विशेष अहमदाबाद येथून शुक्रवार दिनांक ०६,१३,२० सप्टेंबर रोजी संध्याकाळी १६.००  वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९.४० वाजता मंगुळुरु येथे पोहोचेल. (पनवेल स्थानकावरील वेळ – ००:४५)
[spacer height=”20px”]
गाडी क्रमांक ०९४२३ विशेष मंगुळुरु येथून शनिवार दिनांक ०७,१४,२१ सप्टेंबर रोजी रात्री २१.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०१:१५ वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल. (सावंतवाडी स्थानकावरील वेळ – पहाटे ०६.००)
[spacer height=”20px”]
थांबे: गेरातपुर,नाडियाद, आनंद, वडोदरा, भारूच, सुरत, वापी, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा,रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम, करमाळी आणि दक्षिणेकडील राज्यातील थांबे.
[spacer height=”20px”]
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५, सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २४ डबे
[spacer height=”20px”]

कसारा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली

नाशिक : संततधार पावसात शनिवारी सकाळी कसारा घाटातील रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक-मुंबई रेल्वे मार्गावरील हा मार्ग असून त्यावरील वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळविण्यात आली आहे. रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून लवकरच दगड व मातीचा भराव हटवला जाईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कसारा घाटातील अन्य दोन मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे.

मागील काही दिवसांपासून इगतपुरी व कसारा भागात संततधार सुरू आहे. मध्यरात्रीपासून पावसाने चांगलाच जोर पकडला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या घाटातील रेल्वे मार्गावर ही घटना घडली. बोगद्याबाहेर एका रेल्वेमार्गावर दगड आणि मातीचा भराव आल्याचे गस्ती पथकाला लक्षात आले. त्यांनी तातडीने रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली. काही वेळात रेल्वेचे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आल्याचे रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

काही दगड व मातीचा भराव रेल्वे मार्गावर आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. कसारा घाटात एकूण तीन रेल्वे मार्ग आहेत. उर्वरित दोन मार्गांवर कुठलाही परिणाम झालेला नाही. नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्या घाटातील मधल्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. रेल्वेचे पथक माती हटविण्याचे काम करीत आहे. हे काम झाल्यानंतर रेल्वे मार्गाचे काही नुकसान झाले आहे का, याची पडताळणी केली जाईल. नंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सिंधुदुर्गातील जंगलात साखळदंडाने बांधलेल्या त्या विदेशी महिलेबाबत अधिक माहिती समोर; ४० दिवसांपासून होती त्या जंगलात

Sindhudurg Crime : सावंतवाडीमधील रोणापाल-सोनुर्ली येथील घनदाट जंगलात 27 जुलै रोजी एक विदेशी महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. ललिता कायी कुमार एस. असं या महिलेचं नाव असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ललिता कायी कुमार एस. ही महिला मूळ अमेरिकन असून सध्या तामिळनाडूमध्ये वास्तव्यास होती.

सदर घटनेबाबत पोलीसांकडून तपास सुरु आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कायी कुमार एस. ही उच्चशिक्षित असून ती योगाचे शिक्षण घेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी भारतात तामिळनाडू येथे आली होती. त्यापूर्वी काय कुमार एस. ही अमेरिकेत प्रसिद्ध बॅले डान्सर व योग शिक्षक होती. या महिलेने कागदावर इंग्रजी भाषेतून आपल्यावर पतीने अत्याचार करून घातक औषधे दिली व जंगलात बांधून ठेवल्याची माहिती दिली होती.

महिलेकडून पतीचे नाव-

पोलिसांकडून प्राथमिक तपास म्हणून सदर महिलेला काही प्रश्न विचारले. यावेळी ती महिला हे कृत्य पतीकडून केले असं म्हणत होती. सतत ती पतीचेच नाव घेत होती. यावरुन पोलीस सध्या तिच्या कुटुंबियांविषयी माहिती घेत आहेत.

नेमकं काय घडलं?

सदर महिलेच्या उजव्या पायाला साखळदंड घालून ते एका झाडाच्या बुंध्याला लॉक करण्यात आले होते. तीन दिवस उपाशी राहिल्याने ती महिला बोलण्याच्या स्थितीत नव्हती. सोनुर्लीतील काही गुराखी गुरे चारण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना या महिलेचा आवाज आला. त्यानंतर त्या गुराख्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिला साखळदंडातून सोडवून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे. सदर महिला अनेक दिवस उपाशी असल्याने, तिला अन्न-पाणी न मिळाल्याने अत्यंत अशक्त झाली होती. उपचार सुरू झाल्यानंतर त्या महिलेने एका कागदावर लिहून तिच्या पतीवर आरोप केले आहेत. तिच्या पतीनेच जंगलात झाडाला साखळदंडाने बांधल्याचं तिने सांगितलं. तसेच गेल्या 40 दिवसांपासून ती त्या जंगलात होती असा दावा या महिलेने केला आहे.