Author Archives: batmi24

भारताचे ॲमेझॉन खोरे: सावंतवाडी, कुडाळ, कणकवली आणि वैभववाडी तालुक्यातील २०० पेक्षा अधिक गावे ‘पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील’


सिंधुदुर्ग: केंद्र सरकारने पश्चिम घाटातील इको- सेन्सिटिव्ह झोनसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यात सिंधुदुर्गातील १९२ गावांचा समावेश आहे. तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग वनविभागाने आंबोली ते मांगेलीपर्यंतच्या पट्ट्‌यातील २५ गावांचा इको- सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील इको सेन्सिटिव्ह झोनमधील गावांची संख्या २०० च्या वर जाणार आहे. इको सेन्सिटिव्ह झोनची सूचना जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारने खाण प्रकल्प, गौण खनिज उत्खनन तसेच वाळू उत्खननावर बंदी आणली आहे.

[spacer height=”20px”]

सावंतवाडी तालुक्यातील गावे

शिरशिंगे, आंबोली, गेळे, सावरवाड, वेर्ले, सांगेली, ओवळीये, आंबेगाव, माडखोल, कुणकेरी, पारपोली, नेने, देवसु, मसुरे, केगद, दाणोली, भोम, निरुखे, चराठे, केसरी, फणसवडे, कारिवडे, बावळाट, सावंतवाडी, ब्राह्मणपाट, सरमळे, दाभिल, उडेली, कोनशी, घारपी, माजगाव, असनिये, तांबोळी, कुंभवडे, डेगवे, बांदा, पडवे माजगाव, पडवे, दांडेली, मडुरा, आरोस, गाळेल, कोंडुरे, सातार्डा, डोंगरपाल गुळदुवे, साटेली तर्फ सातार्डा.

[spacer height=”20px”]

कुडाळ तालुका

कुपवडे, गवळगाव, भटगाव, दुर्गानगर, भडगाव बुद्रुक, सोनवडे तर्फ कळसुली, भरणी, घोटगे, निरुखे, पांग्रड, वर्दे, कडावल, आवळेगाव, कुसगाव, रुमडगाव, गिरगाव, किनळोस, नारुर खुर्द, नारुर, केरवडे, निळेली, पणदूर, वसोली, चाफेली, गोठोस, निवजे, साकिर्डे, उपवडे, पुळास, गांधीग्राम, वाडोस, वालावल, आंबेरी, मोरे, मुड्याचा कोड, कांदोळी, भडगाव, कालेली, तालीगाव, मुणगी, भट्टी गाव, तेंडोली, आकेरी

[spacer height=”20px”]

कणकवली तालुका

वांयगणी, शेर्पे, जांभनगर, दारुम धारेश्वर, ओझरम, नागसावंतवाडी, घोणसरी, कोळोशी, फोंडाघाट, डामरे, आयनल, उत्तर बाजारपेठ, कोंडये, हरकुळ खुर्द, सावडाव, माईण, भरणी, कुंभवडे, तरंदळे, गांधीनगर, रामेश्वर नगर, भिरवंडे, हंबरणे, पिसेकामते, वरवडे, नाटळ, दारिस्ते, दिगवळे, शिरवळ, रांजणगाव, कसवण, पिंपळगाव, ओसरगाव, भैरवगाव, व्यंकटेश-वारगाव, नरडवे, जांभळगाव, कळसुली,

[spacer height=”20px”]

वैभववाडी तालुका

तिरवडे तर्फ सौंदळ, नेर्ले, पलांडेवाडी, जांभवडे, आखवणे, मांडवकरवाडी, उपळे, मुंडे, भोम, ऐनारी, भुईबावडा, तिरवडे तर्फ खारेपाटण, भट्टी वाडी, रिगेवाडी, मधलीवाडी, कुंभार्ली, कुंभवडे, पिंपळवाडी, भुर्डेवाडी, एडगाव, करुळ, नारकरवाडी, नावळे, वयम्बोशी, सांगुळवाडी, वाभवे, निमअरुळे, मोहितेवाडी, सडुरे, शिरोली, आचिर्णे, कुर्ली.

वारकऱ्यांसाठी पंढरपूर येथे राज्यातील पहिल्या १ हजार खाटांच्या सामान्य रुग्णालयास मान्यता

शासन निर्णय जारी; आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा पुढाकार

मुंबई, दि. १०:  आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघ या चार वारी कालावधीत दाखल होणारे लाखो वारकरी तसेच दैनंदिन वाढत असलेल्या रूग्णांची मोठी संख्या लक्षात घेत तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे सर्व सुविधायुक्त राज्यातील पहिले १ हजार खाटांचे सामान्य रूग्णालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे विशेष बाब म्हणून यासाठी मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

पंढरपुरात सध्या १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय कार्यरत आहे. मात्र, वर्षभरात येथे भरणाऱ्या प्रमुख चार वारीच्या कालावधीत लाखोंच्या संख्येने वारकरी दाखल होतात. यासह श्री विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज वारकरी, भाविकांची वर्दळ असते. पंढरपूर तीर्थक्षेत्र राष्ट्रीय महामार्गांनी जोडले आहे. त्यामुळे बाहेरूनही मोठ्या प्रमाणावर रूग्ण येथे येत असतात. या सर्वांचा मोठा ताण उपजिल्हा रूग्णालयावर पडतो. तसेच अनेकांना नाईलाजास्तव खासगी रूग्णालयांमध्ये महागडे उपचार घ्यावे लागतात. या पार्श्वभूमिवर नुकतेच आषाढी यात्रा कालावधीत सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. सावंत यांनी येथील उपजिल्हा रूग्णालयाची क्षमता तसेच आरोग्य सेवेवर पडणारा ताण याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ येथे १ हजार खाटांचे सर्व सोयी-सुविधांनीयुक्त रूग्णालय उभारणीस मंजुरी देण्याचे सूतोवाच केले होते. तसेच याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले होते.

दि.५ ऑगस्ट रोजी आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक यांनी पंढरपूर येथे १ हजार खाटांचे सामान्य रूग्णालय उभारणीबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. यात विशेष बाब म्हणून येथील उपजिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे प्रस्तावित केले होते. त्यानुसार राज्य शासनाने तात्काळ मान्यता दिली असून शासन निर्णयही गुरूवारी जारी करण्यात आला आहे.

नवनिर्मित सामान्य रुग्णालयात अशी असेल रचना

नवनिर्मित १ हजार खाटांच्या या रूग्णालयात सामान्य रूग्णालय ३०० खाटा, महिला व शिशु रूग्णालय ३०० खाटा, ऑर्थोपेडिक व ट्रामा केअर रूग्णालय १५० खाटा, सर्जरी रूग्णालय १०० खाटा, मेडिसीन अतिदक्षता रूग्णालय १०० खाटा व मनोरूग्णालय ५० खाटा अशी रचना असणार आहे. यासाठी जागा उपलब्ध करून बांधकाम व पदनिर्मितीची स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल, असे निर्णयात नमूद करण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम विभागास एकत्रित अंदाजपत्रक व आराखडे सादर करण्यास सूचित करण्यात आले असण्याची माहिती देण्यात आली आहे.

मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडून घेण्याचे आवाहन; जोडण्यासाठीचे पर्याय कोणते?

मुंबई, दि. १०  : महाराष्ट्र राज्यात होणार असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यात मतदारांसाठी दावे आणि हरकतींसाठी दि. ०६ ऑगस्ट २०२४ (मंगळवार) ते २० ऑगस्ट २०२४ (मंगळवार) हा कालावधी निश्चित केला गेला आहे. या कार्यक्रमातंर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलांमध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करण्याची संधी देखील उपलब्ध आहे. यामध्ये मतदारांनी मतदार यादीतील आपल्या नावासोबत स्वतःचा मोबाईल क्रमांक जोडून घेण्याची संधी मिळणार आहे. तरी सर्व मतदारांनी आपले मोबाईल क्रमांक मतदार यादीतील आपल्या नावासोबत जोडून घ्यावे,असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्राद्वारे केले आहे.
[spacer height=”20px”]
मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडण्याचे फायदे
निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी विविध सूचना आणि माहिती पाठविली जाते. त्यामध्ये मतदान केंद्र, मतदानाची तारीख, मतदानाची वेळ इत्यादी महत्त्वाची माहिती या बाबी समाविष्ट असतात. मतदानाच्या दिवशी आपला वेळ वाचवण्यासोबतच, विनासायास मताधिकार बजावण्यासाठी  ही माहिती कामी येते. त्यामुळे मतदार यादीत आपला मोबाईल क्रमांक जोडलेला असल्याने भारत निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना आणि निर्देशांची माहिती मतदारांना सुलभतेने  प्राप्त होते.  भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राबवले जाणारे मतदार सर्वेक्षणासारखे उपक्रम, मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्या संदर्भातील अर्जावरील कार्यवाही याबाबतच्या सूचना – नोटीसा, पंचनाम्याची सूचना (असेल तर) प्राप्त होते, आणि संभाव्य कार्यवाही सुलभ होते. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या संकेतस्थळाद्वारे तसेच Voter Helpline अॅपद्वारे मतदार यादीतील आपल्या नावाचा सुलभतेने शोध घेता येतो. त्यासोबतच मतदारांना आपले ई – मतदार ओळखपत्र ही सहजतेने डाऊनलोड करता येते.
[spacer height=”20px”]
एक मोबाईल क्रमांक एकाच मतदाराच्या अर्जासोबत जोडणे आवश्यक
देशात मोबाईलचा वापर सुरू झाल्याच्या सुरुवातीच्या काळात मोबाईल वापरकर्त्यांची संख्या अत्यंत नगण्य होती. त्यामुळेच याआधी नोंदणी झालेल्या बहुतांश मतदार ओळखपत्रधारकांचे मोबाईल क्रमांक त्यांच्या नावासोबत जोडलेले नाहीत. यासोबतच ऑनलाईन पद्धतीत एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर करून एकापेक्षा अधिक जणांचे मतदार नोंदणी अर्ज भरले जातात. अशावेळी सदर मोबाईल क्रमांक हा विशिष्ट मतदारापुरताच मर्यादीत नसल्याने तो कोणाही मतदाराच्या नावासोबत त्याचा विशिष्ट म्हणजेच युनिक मोबाईल क्रमांक म्हणून जोडला जात नाही. हे टाळण्यासाठी एका मोबाइल क्रमांकाचा वापर फक्त एकाच मतदार ओळखपत्रासाठी केला जावा.  त्यामुळे विद्यमान मतदारांसह ज्यांच्या मतदार यादीतील नावासोबत त्यांचा विशिष्ट, अर्थात युनिक मोबाईल क्रमांक जोडलेला नाही, त्यांनी अर्ज क्र. ८ भरून आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडून घेणे मतदारांच्या हिताचे आहे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
[spacer height=”20px”]
मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडण्यासाठीचे पर्याय :-
१) नव मतदार नोंदणीचा अर्ज भरताना-
नव मतदार नोंदणीचा अर्ज भरताना आपल्याला अर्जात स्वतःचा मोबाईल क्रमांक  देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्याचवेळी आपण इतर कोणत्याही मतदार ओळखपत्रासाठी वापरला न गेलेला असा स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला तर तो मतदार यादीत आपल्या नावासोबत जोडला जातो.
[spacer height=”20px”]
२) विद्यमान नोंदणीकृत मतदारांसाठी अर्ज क्र. ८
भारत निवडणूक आयोगाच्या मतदारांकरता असलेल्या अर्ज क्र. ८ मध्ये मतदार यादीतील वैयक्तिक तपशीलांमधील बदल, दुरुस्त्या आणि अद्ययावतीकरणा अंतर्गत मतदार यादीत आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडण्याचा पर्याय दिला आहे.  हा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने भरता येतो.
ऑनलाईन अर्ज भरण्याकरता voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline हे मोबाईल अॅप वापरता येते. या संकेतस्थळावर लॉगीन केल्यावर अर्ज क्रमांक ८ निवडून, त्यात  ‘Correction of Entries in Electoral Roll’ या सुविधे अंतर्गत, आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडण्याचा पर्याय मिळतो.
[spacer height=”20px”]
ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी मतदार जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन, तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष शिबिरांमध्येही ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतील.
[spacer height=”20px”]
आपण आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता आणि त्यांनाही मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडून देण्याची विनंती करू शकता, असे अवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

मुंबई म्हाडाच्या २०३० घरांच्या विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरवात; अर्ज कसा कराल?

मुंबई : म्हाडाच्या गोरेगाव, अँटॉप हिल, कोपरी पवई, कन्नमवारनगर, शिवधाम कॉम्प्लेक्स (मालाड) या गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांतील दोन हजार ३० घरांच्या विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला शुक्रवार, ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ पासून सुरुवात होणार आहे. १३ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता लॉटरी काढण्यात येईल. अर्ज प्रक्रियेची लिंक दुपारी १२ पासून उपलब्ध होईल. ऑनलाइन अर्जांची मुदत ४ सप्टेंबर, दुपारी ३ पर्यंत आहे. अनामत रकमेची ऑनलाइन स्वीकृती ४ सप्टेंबर रात्री ११:५९ पर्यंत केली जाईल. अर्जांची प्रारूप यादी ९ सप्टेंबरला सायंकाळी ६ पर्यंत प्रसिद्ध होईल. ऑनलाइन दावे, हरकतीसाठी ९ सप्टेंबर, दुपारी १२ पर्यंत मुदत आहे. अर्जाची अंतिम यादी ११ सप्टेंबरला सायं. ६ वाजता प्रसिद्ध होईल.

घरे आली कोठून? 

म्हाडाने स्वत: बांधलेल्या १३२७ घरांबरोबरच कास नियंत्रण नियमावली ३३(५), ३३(७) आणि ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून बिल्डरांकडून गृहसाठा म्हणून मिळालेली ३७० घरे आणि पूर्वीच्या लॉटरीतील विविध वसाहतींत विखुरल्या स्वरूपात असलेल्या ३३३ घरांचा समावेश या सोडतीत करण्यात आला आहे.

सोडतीसाठी

लॉटरीत सहभागी होण्याकरिता म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टीम मोबाइल ॲपची सुविधा

https://housing. mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी, अर्ज भरणा आणि अनामत जमा प्रक्रिया अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनिचित्रफिती आणि हेल्प फाईल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे .

वार्षिक उत्पन्न मर्यादा गट – उत्पन्न मर्यादा अत्यल्प ६ लाख, अल्प ९ लाख ,मध्यम १२ लाख,  उच्च १२ लाखांहून अधिक (या गटासाठी कमाल मर्यादा नाही.)

सावधानम्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार आणि प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणाशीही व्यवहार करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

गणेशभक्तांना खुशखबर; आता ‘क्यूआर” द्वारे मिळणार कृत्रिम तलावांची माहिती

मुंबई: गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात कृत्रिम तलावांची यादी गुगल मॅपवर मिळणार आहे. क्यूआर कोडद्वारे गणेशभक्तांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. यंदाचा गणेशोत्सव ७ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होत आहे. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ऑनलाईन खरेदी माध्यमांशी संपर्क साधून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घरपोच वितरण करण्याच्या सुविधा पुरवण्याकरत समन्वय देखील साधण्यात येणार आहे. याच उपक्रमांचा भाग म्हणून श्रीगणेश मूर्ती घडविणाऱ्या मुर्तिकारांना शाडूची माती पुरविणे, काही ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे, मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने श्री गौरव स्पर्धेचे आयोजन करणे असे विविध उपक्रम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहेत.
[spacer height=”20px”]

मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीत यंदाच्या गणेशोत्सवात कृत्रिम तलावांची संख्या २०० पेक्षा अधिक वाढवण्याचे लक्ष्य असल्याचे मंगलप्रभात लोढा म्हणाले.

परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनससाठी राबवलेल्या “हर घर टर्मिनस” मोहिमेला कोकणवासियांचा अभूतपूर्व प्रतिसाद

आतापर्यंत २००० पेक्षा जास्त संख्यने ई-मेल पाठवले गेले– फेसबुक वरील रील मोठ्याप्रमाणात व्हायरल –व्हाट्सअँप ग्रुप एका दिवसात फुल्ल
   Follow us on        
[spacer height=”20px”]
सावंतवाडी:दि. १४ जुलै: कोकण रेल्वे येण्यासाठी कोणताही विरोध न करता आपल्या जमिनी या प्रकल्पाला देणाऱ्या कोकणकरांच्या हाती दोन ते तीन गाड्या सोडल्या तर काही लागले नाही. अनेकवर्षे प्रवासी संघटनेने केलेल्या वसई-सावंतवाडी, कल्याण-सावंतवाडी, बोरिवली/सावंतवाडी या मार्गावर गाड्यांच्या केलेल्या मागण्या अपूर्ण आहेत. या गाड्या चालविण्यासाठी सावंतवाडी टर्मिनस चे काम पूर्ण होणे महत्वाचे आहे. होळी- गणेशचतुर्थीला कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालविण्यात येतात. मात्र सावंतवाडी टर्मिनस च्या अपूर्ण कामामुळे त्या गाड्या दक्षिणेकडील राज्यात पाठवल्या जातात आणि ज्यांच्यासाठी या गाड्या सोडल्या त्यांनाच रेल्वे आरक्षणापासून वंचित राहावे लागते. चार दिवसांपूर्वी पेडणे येथील बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे कोकणरेल्वे पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या घटनेने मागील ९ वर्षे विनाकारण रखडलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची गरज पुन्हा एकदा जाणवली आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटना,सावंतवाडी या संघटनेद्वारे कोकणकर पुन्हा एकदा या प्रश्नावरून आक्रमक झाला. सावंतवाडी टर्मिनस च्या रखडल्या कामाविरोधात  आणि अन्य प्रश्नांसाठी संघटनेने  “हर घर टर्मिनस” ही मोहीम राबवली असून मागील दोन दिवसांत समस्त कोकणकरांचा या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
[spacer height=”20px”]
हर घर टर्मिनस मेल मोहिम
संघटनेने “हर घर टर्मिनस मेल मोहिम ” राबवली असून समस्त कोकणवासीयांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
[spacer height=”20px”]
आपल्या हक्कासाठी, कोकणकरांच्या सुखकर व निर्विघ्न प्रवासासाठी संवैधानिक हक्कासाठी,  भुमीपुत्रांच्या विकासासाठी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत तत्काळ विलीनीकरण व्हावे, सांवतवाडी येथे रेल्वे टर्मिनस व्हावे, फक्त व फक्त कोकणासाठी नवीन गाड्या किंवा वाढीव थांबे मिळावे या आपल्या मागण्यांसाठी रेल्वे प्रशासन, केन्द्र सरकार व राज्य सरकारला जाग येण्यासाठी शेकडोच्या संख्येने ईमेल पाठवायचे आहेत.  सोबत मेलचा मायना दिला आहे तो आपल्या ईमेल ने सन्माननीय रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री, रेल्वे बोर्ड, रेल्वे विभाग व कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक आणि महाराष्ट्र शासनाचे मंत्री यांना पाठवायचे आहेत हजारोंच्या संख्येने ईमेल सर्व बांधव, भगिनी, कोकणवासी, सार्वजनिक मंडळ, कोकण विकास समित्या, समाजिक संस्था व कार्यकर्त्यांच्या घराघरातून सर्वानी वैयक्तिक पाठवायचे आहेत. फक्त एका टिचकीवर किंवा वरील QR Code द्वारे हे निवेदन आपल्या जिमेल मध्ये उघडेल तेथून फक्त आपल्याला सेंड बटन दाबून पाठवायचे आहे असे आवाहन संघटनेद्वारे करण्यात आले आहे.
[spacer height=”20px”]
[spacer height=”20px”]
या मोहिमेत आतापर्यंत २००० पेक्षा जास्त संख्यने ई-मेल पाठवले गेले असून या मोहिमेस खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याची संघटनेतर्फे श्री. सागर तळवडेकर यांनी दिली आहे.
[spacer height=”20px”]
‘ती’ पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल 

सावंतवाडी टर्मिनसच्या सुशोभणीकरणादरम्यान प्रवशेद्वारावर लावण्यात आलेल्या “सावंतवाडी रोड” फलकाच्या निषेधार्थ फलकाच्या समोरच संघटनेतर्फे नाराजीचे फलक लावण्यात आले आहेत. या संबंधित पोस्ट केलेली एक रील समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून आतापर्यंत ७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूव्स Views आले तर हजारो कोकणकरांनी तिला लाईक केले आहे. संघटनेतर्फे बनविण्यात आलेल्या व्हाट्सअँपग्रुपला पण खूप मोठा प्रतिसाद लाभत असून फक्त एक दिवसात ग्रुप फुल्ल झाला आहे. तर अन्य ग्रुप ची लिंक या बातमीत खाली दिली आहे.
[spacer height=”20px”]

Breaking: रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,अनेकांचे सुरक्षित जागी स्थलांतर

रत्नागिरी: चिपळूण खेड दापोली भागात पावसाचा जोर वाढत चालला आहे रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खेड येथील जगबुडी नदीला पूर आला आहे. खेड बाजारपेठेत पाणी शिरले आहे. यंत्रणा अलर्ट झाली असून अनेकजणांना सुरक्षितेसाठी स्थलांतरित करण्यात आले आहे.
[spacer height=”20px”]
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर सुरू असून अनेक सखल भागात पाणी भरण्याचे प्रकार घडले आहेत. सुरक्षिततेसाठी काही जणांना स्थलांतरित करण्यात येत आहे. खेड शहरातील नदीकाठच्या काही लोकांना स्थलांतरित करण्यात आला आहे. चिपळूण शहरालाही पुराची भीती असून वशिष्ठी नदीने इशारा पातळी गाठली आहे. या सगळ्या वरती चिपळूण व खेड नगरपरिषद प्रशासन लक्ष देऊन असून अलर्ट मोडवर आहे. तर तिकडे गुहागर तालुक्यात खवळलेल्या समुद्रात नौका बुडाली आहे, सुदैवाने आतील चार ते पाच खलाशी हे सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले आहेत.गुहागर तालुक्यात पाचेरी सडा येथे मार्गावरील येथे डोंगर खचण्याचा प्रकार घडला असून माती रस्त्यावरती आली आहे. त्यामुळे येथील बौद्धवाडी येथील काय कुटुंबांना त्यामुळे स्थलांतर करण्यात आल आहे. गुहागर तालुक्यातील अति दुर्गम भाग असलेल्या पाचेरी सडा हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अशातच रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोठी भरती असल्याने पुराच पाणी च पाणी चिपळूण व खेड बाजारपेठेत भरण्याची भीती व्यक्त होत आहे. खेडच्या जगबुडीने सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दरम्यान धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड दापोली रस्ता पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
[spacer height=”20px”]

Breaking: कोकणरेल्वे पुन्हा थांबली: वीर-चिपळूण विभागातील करंजाडी-विन्हेरे स्थानकांदरम्यान दरड कोसळली

रत्नागिरी, १४ जुलै, १८:३० | कोकण रेल्वेच्या वीर-चिपळूण विभागातील करंजाडी-विन्हेरे स्थानकादरम्यान रेल्वेमार्गावर आज संध्याकाळी ५ च्या सुमारास भूस्खलन झाल्याने कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसपंर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी ही माहिती दिली आहे.  या व्यत्ययामुळे  गाडी क्रमांक १२६१९ मत्स्यगंधा एक्स्प्रेस रोहा स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस दिवाणखवटी येथे अडकली आहे. मडगाव – सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकावर थांबविण्यात आली आहे.

[spacer height=”20px”]
हा अडथळा दूर करून लवकरच वाहतूक चालू करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. मार्गावरील दरड दूर करण्यास किमान दोन ते अडीच तासांचा वेळ अपेक्षित आहेत.
[spacer height=”20px”]
अधिक माहिती प्रतिक्षीत आहे………..

कुडाळ: शाळकरी मुलांकडून साळगाव जांभरमळा प्राथमिक शाळेतील मुलांना वह्या वाटप

क्रिकेट व भजन मंडळाच्या माध्यमातून प्राप्त रक्कमेचा समाजोपयोगी विनियोग

 

साळगाव जांभरमळा येथील श्री पाटेकर बालगोपाल भजन व क्रीडा मंडळाने मे 2024 मध्ये क्रिकेट सामने आयोजित केले होते. जमा झालेल्या निधीतून या मंडळातील शाळकरी मुलांनी शैक्षणिक उपक्रम हाती घेतला. साळगाव जांभरमळा प्राथमिक शाळेतील मुलांना वह्या वाटप करून या मंडळातील शाळकरी मुलांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. साळगाव पंचक्रोशी मध्ये या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या मंडळातील कु. चैतन्य हळदणकर, कु. स्वप्नील सामंत, कु. सर्वेश हळदणकर, कु. तुकाराम हळदणकर, कु. कुणाल पारकर, कु. अजिंक्य हळदणकर, कु. शंकर नागडे, कु. प्रथमेश डिचोलकर, कु. सोहम हळदणकर, कु. साहिल हळदणकर, कु. शुभम धुरी यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

[spacer height=”20px”] वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी पालकवर्गातून श्री. सुखानंद हळदणकर, श्री.निलेश सावंत, श्री.शुभम धुरी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. प्रशांत वेंगुर्लेकर सर, शिक्षक श्री. विनेश जाधव सर यांनी साळगाव जांभरमळा शाळेच्या वतीने श्री पाटेकर बालगोपाल भजन व क्रीडा मंडळाचे आभार व्यक्त केले

[spacer height=”20px”]

Konkan Railway | उद्याची जनशताब्दी एक्सप्रेस रद्द; कोचुवेली एक्सप्रेस उशिराने धावणार

   Follow us on        
Konkan Railway Updates: कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक अजूनही पूर्वपदावर आले नसून बऱ्याच गाड्या उशिराने धावत आहेत तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात अजून काही गाड्यांची भर पडली असून आताच हाती आलेल्या माहितीनुसार  उद्या दिनांक १७ जुलै रोजीची मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस (१२०५२) पूर्णतः रद्द करण्यात आली आहे तर आज दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२११३  लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली एक्सप्रेस जी संध्याhttp://batmi24.in/wp-admin/edit.phpकाळी १६:४५ वाजता सुटणार होती ती १७ जुलैला ००:५० वाजता म्हणजे आज मध्यरात्री सोडण्यात येणार आहे.
 
जाहिरात - गणपती मकर- किंमत फक्त ८९९ रुपये
[irp posts=”13681″ ]